नवी दिल्ली : देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण व भारताची शान असलेल्या इंडिया गेटजवळ लवकरच दररोज संगीत कारंजे व लाइट शोचा नजराणा पाहायला मिळणार आहे. येथे दरवर्षी लाखोंनी भेट देणा-या पर्यटकांच्या आकर्षणात आता ही नवी भर पडणार आहे.नागरी व्यवहार व गृहनिर्माण मंत्रालयाने ४५ कोटी रुपयांचा आराखडा बनवला आहे. विजय चौकापासून इंडिया गेटपर्यंत व पुढे नॅशनल स्टेडियमपर्यंतचा परिसर सुशोभित करणार आहे. इंडिया गेट, बोट क्लब व सेंट्रल व्हिस्टा परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी तीन रंगीत-संगीत कारंजे व १२ रंगीत कारंजे बसवण्यात येणार आहेत.- दररोज सायंकाळी युद्धस्मारक व इंडिया गेटच्या हिरवळीवर भेट देणाºयांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगीत कारंजे व लाइट शोचे आयोजन करण्यात येणार आहे. पुनर्विकासाचे हे काम येत्या एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहकार्य घेतले जात आहे.पर्यटक आवर्जून भेट देतात!नवी दिल्लीत देश-विदेशातील हजारो पर्यटक भेट देतात. त्यातील प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र वेगवेगळे असले तरी पुढील ठिकाणी ते आवर्जून भेट देतात. लाल किल्ला, संसद भवन, राष्टÑपती भवन, इंडिया गेट, कुतुबमीनार, जामा मशीद, चांदनी चौक, अक्षरधाम मंदिर, राष्टÑीय प्राणिसंग्रहालय, लोटस टेम्पल, दिवंगत राष्टÑपुरुषांची समाधी आदी ठिकाणी पर्यटक आवर्जून जातात.
इंडिया गेटवर संगीत कारंजे, लाइट शो; लवकरच पडणार पर्यटकांच्या आकर्षणात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 6:17 AM