शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
2
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
3
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
4
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
5
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
6
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
7
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
8
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
9
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
10
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
11
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
12
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
13
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
15
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
16
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
18
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
19
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
20
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने, नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेख 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 5:15 PM

Muslim Community Protest Against Israel: आज शुक्रवारची नमाज आटोपल्यानंतर देशातील काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात तीव्र निषेध आंदोलने करण्यात आली.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मागच्या वर्षभरात इस्राइलने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेत हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. या दोन्ही संघटनांचे अनेक बडे नेते आणि कमांडर इस्राइलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. दरम्यान, इस्राइलने नुकत्याच केलेल्या एका मोठ्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह हा सुद्धा मारला गेला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने आज हसन नसरुल्लाह याचा अगदी गुप्तपणे जनाजा काढून त्याला एका अज्ञात ठिकाणी दफन केले. दरम्यान, इस्राइलकडून सुरू असलेल्या या कारवायांविरोधात भारतातील मुस्लिम समुदायाकडूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज शुक्रवारची नमाज आटोपल्यानंतर देशातील काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात तीव्र निषेध आंदोलने करण्यात आली.

इराणचे सर्वोच्च नेते असलेल्या अयातुल्ला खोमेनी यांनी आज शुक्रवारची नमाज आटोपल्यावर इस्राइलवर जोरदार टीका केली. तसेच इस्राइल हा जगभरातील मुस्लिमांचा शत्रू आहे असं सांगत त्यांनी शत्रूला पराभूत करण्यासाठी जगभरातील मुस्लिमांनी एकत्र यावं, असं आवाहन केलं. यादरम्यान, भारतामध्येही अनेक राज्यांत शुक्रवारची नमाज झाल्यानंतर मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

दिल्लीमधील जोरबाग परिसरात असलेल्या शाह ए मर्दा मशिदीबाहेर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाहचा शहीद असा उल्लेख करून त्याचे फोटो लावण्यात आले होते. तसेच नमाज आटोपल्यावर इथे इस्राइलविरोधात आंदोलन करण्यात आले, बिहारमधील मुझफ्फरनगर येथे हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाह याचा दहशतवादी असा उल्लेख करण्याविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच मेणबत्ती मोर्चाही काढण्यात आला. यावेळी लोकांनी हसन नसरुल्लाह याचा शहीद असा उल्लेख करून इस्राइलविरोधात घोषणाबाजी केली.  

लखनौमध्ये शिया धर्मगुरू कल्बे जव्वाद यांनी इराणने इस्राइलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचं समर्थन करताना हे स्वसंरक्षणार्थ उचलेले पाऊल आहे, असे सांगितले. इस्राइलला शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांनी मानवतेविरोधात काम केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलMuslimमुस्लीमIndiaभारत