शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी मुस्लिम व्यक्तीचा पुढाकार

By admin | Published: October 27, 2016 7:11 PM

पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीनं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडवलं आहे.

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 27 - राजकारणासाठी एकीकडे धर्मांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरू असतानाच पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीनं हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर येथील रहिवासी असलेले यासिन पठाण यांनी अनेक वर्षांपूर्वीच्या 34 मंदिरांच्या संरक्षण आणि जीर्णोद्धारासाठी आंदोलन छेडलं आहे. यासीन पठाण हे एका शाळेत शिपायाची नोकरी करत होते. या नोकरीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक मंदिरांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. त्यांनी मंदिरांच्या संरक्षण आणि जीर्णोद्धारासाठी आंदोलनही छेडलं आहे. अनेक वर्षांपासून ते कार्याशी जोडले गेले आहेत. जवळपास 34 मंदिरांची स्थिती सुधारण्यासह जीर्णोद्धारासाठी ते आंदोलन करत आहेत.यासीन पठाण यांच्या मते पश्चिम बंगालमधल्या मिदनापूरमध्ये जवळपास 300 वर्षं जुनी अनेक मंदिरं आहेत. ज्या भागात हे मंदिर आहेत तेथे पूर्वी 80हून अधिक मंदिरं होती. मात्र त्यातील बरीचशी आता गायब झाली आहेत. सुरुवातीच्या काळात मुस्लिम असल्याकारणानं हिंदूंनी त्यांना विरोध केला होता. मात्र त्यांनी तरीही आजतागायत मंदिरांच्या बचावासाठी आंदोलन अविरत सुरू ठेवलं आहे. 1973पासून ते मंदिराच्या बचावासाठी कार्य करत आहेत. तर 1992मध्ये त्यांनी आर्कियोलॉजिकल समिती बनवली होती. यासीन पठाण यांना कबीर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.