शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 30, 2020 4:57 PM

यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की

ठळक मुद्देभोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. भारताने फ्रान्सचे उघडपणे समर्थन केले आहे.रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात.

नवी दिल्ली - भोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. यामुळे देशातील एक मोठ्या वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे. भारताने फ्रान्सचे उघडपणे समर्थन केले असताना, एक विशिष्ट समाज त्याला विरोध करून काय सांगू इच्छितो? असा सवाल लोक करत आहेत. यातच फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात भारतात एका विशिष्ट समाजाने केलेले निदर्शन अत्यंत दुर्दैवी असल्याचे, योग गुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, सरकारने अशा प्रकारच्या  कार्यक्रमांना परवानगी देणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Nice Attack: मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे पोस्टर्स पायदळी तुडवले; रझा अकादमीचं कृत्य

'नेहमी-नेहमी एकच समाज का आग लावतो' - यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की आगच लावावी. आपण आपल्या मान्यतांवर विश्वास ठेवा, मात्र, संपूर्ण जगावर तर हे थोपू शकत नाही. स्वतःप्रति दृढ रहा आणि इतरांप्रति उदार रहा. स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ठेवा'. रामदेव म्हणाले, ध्रुवीकरणाचे घृणास्पद राजकारण संपायला हवे. यावर लगाम लागायला हवा.'

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

'धार्मिक उन्मादामुळेच युद्ध होतात' - रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात. 'आजवर जगभरात झालेल्या लढायांचे सर्वात मोठे कारण हे धार्मिक उन्माद आहे. धार्मिक दंगे आहेत.' यावेळी, पैगंबर मोहम्मद, यशू ख्रिस्त, गुरुनानक देव जी, भगवान महावीर, बुद्ध, भगवान राम, कृष्ण, शिव, कुठल्याही महापुरुषाने धार्मिक कट्टरतेसंदर्भात भाष्य केले आहे? असा सवाल करत, कधीच नाही,' असे बाबा रामदेव म्हणाले. या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे, 'सर्व मानुष्य एकसारखेच आहेत. हिंसा तर अत्यंत दूरची गोष्ट, हे म्हणतात, की कधीही कुणाचे मन दुखवू नका. मग हा काय तमाशा सुरू आहे? कशासाठी निदर्शन होत आहे?'

योग गुरू म्हणाले, एखाद्या व्यक्तीची मान कापली जाते, हत्या केली जाते. यासाठी, की आमच्या पुर्वजाचे कार्टून का तयार केले? त्यांनी प्रश्न उपस्थित केला, की 'एवढी असहिष्णुता का?' रामदेव म्हणाले, 'धर्माच्या नावावर हत्या करणे, लोकांचा शिरच्छेद करणे, लोकांची कत्तल करणे, हा धर्म नाही, अधर्म आहे, हे पाप आहे, हा गुन्हा आहे. हे जगाला युद्धाकडे ढकलणारे आहे.'

"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ

'संपूर्ण जगात पसरवला जातोय विध्वंसक विचार' -रामदेव म्हणाले, एक विद्धवंसक विचार संपूर्ण जगात पसरवला जात आहे. काही लोक म्हणतात, की इस्लामचा स्वीकार करा, अन्यथा मारून टाकू. काही लोक म्हणतात, की ख्रिश्चन व्हा, अन्यथा स्वर्ग मिळणार नाही. काही लोक म्हणतात, हिंदू धर्म स्वीकारा, अन्यथा मोक्ष मिळणार नाही. मग परत दुसरे-तिसरे आणखी येतात. रामदेव म्हणाले, 'लोक जोवर आपल्या धर्माला श्रेष्ठ आणि दुसऱ्याच्या धर्माला निकृष्ट म्हणत राहतील, तोवर जगात आग लागतच राहणार.'

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाMuslimमुस्लीमFranceफ्रान्सIslamइस्लाम