एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले आहे. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला मिळालेल्या आरक्षणाची चार कारणं सांगितली. तसेच, भाजपवर समाजाप्रति द्वेष भावना असल्याचा आरोपही केला. ते तेलंगाणामध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. तेलंगाणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
काय म्हणाले ओवेसी -माध्यमांतील वृत्तांनुसार, मुस्लिमांचे 4 टक्के आरक्षण संपवून ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वाटून टाकू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. यावर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष ओवेसी म्हणाले, 'भाजप खोटे बोलत आहे. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळालेले नाही.'
ओवेसे म्हणाले, 'एक तर मुस्लिमांचा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्या मागास असल्याचा डेटाही आहे. दुसरे म्हणजे, दिवंगत पंतप्रधान कृष्णन यांनी एक अहवाल तयार केला होता, यात मुस्लीम समाजातही काही मागास घटक आहेत, ज्यांना रिझर्व्हेशन मिळायला हवे उच्च वर्गातील मुस्लिमांना नाही, असे सांगण्यात आले आहे. तिसरे म्हणजे, हे सर्वच मुस्लिमांना नाही आणि चौथे म्हणजे, त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हटविणे हे राष्ट्र हिताचे आहे.'
यावेळी ओवेसी यांनी भाजपवर समाजाप्रति द्वेश असल्याचा आरोपही केला आहे. 'भाजपला मुस्लीम व्यक्तीने डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, शिक्षक झाल्यास अथवा एमबीए, पीएचडी केल्यास तिटकारा का? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.भाजपचा दावा -शुक्रवारी शाह म्हणाले, 'आम्ही अनेक आश्वासने दिली आहेत. यांपैकी एक म्हणजे, सीएम मागास प्रवर्गातील असेल. आम्ही मुस्लीम आरक्षण संपुष्टात आणू आणि एससी एसटी आणि ओबीसींना आरक्षण देऊ.' याशिवाय, सोमवारही जगतियालमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, भाजप मुस्लिमाना मिळणारे 4 टक्के आरक्षण संपुष्टात आणेन आणि ते अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये वाटून देईल.