लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्याअनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एमआयएमनेही उत्तर प्रदेशाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यासाठी, सध्या उत्तर प्रदेशात एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांचे दौरे वाढले आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना थेट मुस्लीमांना उद्देश भाषण केले. देशातील मुस्लीमांची अवस्था ही लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झाल्याचं ते म्हणाले.
कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. पण, नंतर बाहेरच उभा केलं जात. उत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम समाज आहे. येथे प्रत्येक समाजाकडे नेता आहे, पण मुस्लीम समजाकडे नेता नाही, असेही औवेसी यांनी म्हटले.