ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 15 - अमृतसरमधलं सुवर्णमंदीर आणि मुंबईतला अंधेरीचा राजा यांचं दर्शन घेतल्याबद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना सोहा अली खानने मंदीरात गेले म्हणजे मी गैरमुस्लीम असं होत नाही असं म्हटलं आहे. हा सेक्युलर देश आहे आणि देवळात गेलं म्हणजे मुस्लीम नाही असं होत नाही असं ती म्हणाली.
सोहाने काही दिवसांपूर्वी सुवर्णमंदीराला भेट दिली तसेच गणेशोत्सवामध्ये गणेशाचं दर्शन घेऊन आशिर्वाद मागितला, यामुळे काही सोशल कंटकांनी तिच्या धार्मिक निष्ठेचीच विचारणा केली आणि अशोभनीय भाषेत तिच्यावर टीका केली. याचा समाचार सोहाने घेतला आहे.
विचार स्वातंत्र्याची मी पुरस्कर्ती आहे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यही मानते, परंतु देवळात गेलेली व्यक्ती मुस्लीम नसते असं म्हणणं निर्दयी असल्याचं सोहानं म्हटलं आहे.
मी नमाज पढावा ता चर्चमध्ये जावं, यामुळे कुणाला काय फरक पडतो असा सवालही तिनं केला आहे.
Seeking blessings at Andhericha Raja Ganesh Mandal today #Ganpatipic.twitter.com/8div7NkHBD— Soha Ali Khan (@sakpataudi) September 9, 2016
Feeling blessed ! Golden moment #goldentemple#amritsarpic.twitter.com/AUchA5l3wE— Soha Ali Khan (@sakpataudi) September 3, 2016