एआयएमआयएमचे अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मांतील जनसंख्या असंतुलनासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निशाना साधला आहे. मुस्लीम समाजाने सर्वाधिक गर्भनिरोधकांचा वापर केला असून. एकूण फर्टिलिटी रेट, जो 2016 मध्ये 2.6 टक्के होता, तो कमी होऊन 2.3 टक्क्यांवर आला असल्याचे, म्हटले आहे.
तत्पूर्वी, लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांत धर्मांमधील "लोकसंख्या असमतोल" होणार नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, असे झाल्यास अराजक निर्माण होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. "कुण्या एका वर्गाचा लोकसंख्या वृद्धी दर अधिक, असे होऊ नये. आम्ही 'मूळ निवासीं'च्या जागरूकतेसोबतच लोकसंख्या नियंत्रणावरही करतो. लोकांना अशा प्रयत्नांच्या माध्यमाने लोकसंख्या नियंत्रणासाठी जागरुक करायला हवे,” असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवेसी म्हणाले, “मुस्लीम भारताचे मूळ निवासी नाहीत का? जर प्रत्यक्षात पाहिले, तर मूळ निवासी केवल आदिवासी आणि द्रविड लोक आहेत. उत्तर प्रदेशात, कुठल्याही कायद्याशिवाय, 2026-2030 पर्यंत अपेक्षित प्रजनन दर गाठला जाईल.
ओवेसी म्हणाले, “आपल्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे, की लोकसंख्या नियंत्रणासाठी देशात कुठल्याही प्रकारच्या कायद्याची आवश्यकता नाही. अधिकांश गर्भनिरोधकांचा वापर मुस्लीम समाजच करत आहे. 2016 मध्ये एकूण फर्टिलिटी रेट 2.6 एवढा होता. जो आता 2.3 वर आला आहे.”