13 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच जण हैराण झाले आहेत. देशात हार्ट अटॅकच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आधी साधारणपणे 50, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हार्ट अटॅक यायचा पण आता 40 वर्षे आणि त्याहून लहान लोकांना देखील हार्ट अटॅक येतो, पण मुजफ्फरपूरमधील हार्ट अटॅकची घटना पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.
मुझफ्फरपूरमध्ये 13 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या मुलाच्या अचानक छातीत दुखू लागलं. त्यावेळी कुटुंबीयांना वाटलं की हे सामान्य दुखणं आहे, पण तरीही ते त्याला जवळच्या नर्सिंग होममध्ये घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी सांगितलं की हे दुखणं किरकोळ नसून हार्ट अटॅक आहे. 13 वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक येण्याची घटना खूप धक्कादायक आहे. सध्या मुलाची प्रकृती ठीक आहे, त्याला पाटणा येथील IGIMS येथे पाठवण्यात आले असून तेथे त्याची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
रविवारी हा मुलगा आसनसोलहून ट्रेनने मुझफ्फरपूरला येत होता, तेव्हा त्याच्या छातीत दुखू लागलं, त्यानंतर त्याला गौशाला रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी हार्ट अटॅक असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला मुझफ्फरपूरमध्ये दाखल करण्यात आलं. IGIMS नेण्यात आलं आहे. एवढ्या लहान मुलाला हार्ट अटॅक का आला, याची चौकशी केली जाईल, असं खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं.
कोरोनाच्या कालावधीनंतर हृदयासंबंधित आजारांमध्ये वाढ झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एवढ्या लहान वयात हार्ट अटॅक येणं शक्य नाही, कदाचित त्या मुलाला आणखी काही आजार असण्याची शक्यता असल्याचं हार्ट स्पेशलिस्ट डॉ. अंशु अग्रवाल यांनी सांगितलं. सध्या आयजीआयएमएसमध्ये अँजिओग्राफी टेस्ट आणि त्याच्या रिपोर्टची वाट पाहत आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.