मुझफ्फरपूर : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेचा म्हणजेच यूपीएससीचा (UPSC) अंतिम निकाल आला आहे. या परीक्षेत पुन्हा एकदा बिहारच्या उमेदवारांनी झेंडा फडकवला आहे. मुझफ्फरपूरच्या अनुनय आनंदनेही यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. अनुनय आनंदला 185 वा क्रमांक मिळाला आहे.
अनुनय हा मुझफ्फरपूरमधील सरैयाच्या अजीजपूर गावचा रहिवासी आहे. अनुनयचे सुरुवातीचे शिक्षण मुझफ्फरपूर येथून केले आणि नंतर बोकारो डीपीएसमधून शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला 14 लाखांच्या वार्षिक पॅकेजची नोकरीही मिळाली, परंतु यूपीएससीसाठी नोकरी सोडली.
अनुनय आनंद सध्या दिल्लीत आहेत. त्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबातील सदस्य आनंद साजरा करत आहेत. अनुनयचे वडील मुन्ना प्रसाद बालू-गिट्टीचे दुकान चालवतात, तर आई रश्मी कुमारी गृहिणी आहेत.
दरम्यान, अनुनयचा यूपीएससीचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे अनुनयने व्हिडिओ कॉलद्वारे संभाषणात सांगितले. तसेच, अनुनयने सांगितले की, यूपीएससी परीक्षा द्यायची होती, कारण त्याला आयएएस व्हायचे होते, परंतु आता त्याला 185 रँक मिळाले आहेत, त्यामुळे यावेळी तो आयपीएस होणार आहे.
मुलाच्या यशाने वडील मुन्ना प्रसाद खूप भावूक झाले. ते म्हणाले की, खूप आनंद आहे, जो शब्दात वर्णन करता येणार नाही. तसेच, वडिलांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या मुलाने इंजिनीअरिंग केले तेव्हाच त्यांना समजले की त्यांचा मुलगा भविष्यात काहीतरी मोठे करेल, कारण तो अभ्यासात खूप हुशार होता.
दुसरीकडे, अनुनयची आई रश्मी कुमारी यांनी सांगितले की, आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्या 12 वर्षे बोकारो येथील घरापासून दूर राहिल्या. आज त्यांच्या तपश्चर्येचे फळ मिळाले.