दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्याच वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 'माझे वडील माझे लैंगिक शोषण करायचे. ते रागात मला मारहाणही करायचे असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.
“माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मला अजूनही आठवते. ते घरी यायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची. मला अजूनही आठवते की, मी कित्येक रात्री घाबरुन बेडखाली लपून घालवल्या, यावेळी मी थरथर कापयचे, असंही स्वाती मालवील यांनी म्हटले आहे. मुलींवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी काय करावे, असा विचार त्यावेळी मला यायचा. माझ्यावर झालेला अन्याय मी कधीच विसरणार नाही, ते मला नेहमी मारहाण करायचे, रक्तस्त्राव व्हायचा, खूप मनस्ताप व्हायचा, असंही मालीवाल म्हणाल्या.
ना ओटीपी, ना मेसेज, खात्यावरुन गायब झाले ५ लाख रुपये; अशी झाली फसवणूक, नेमकं काय घडलं?
"या बालपणातील आघातांवर मात करण्यासाठी खूप मदत केली, “माझ्या आयुष्यात माझी आई, मावशी, मामा आणि आजी-आजोबा नसत्या तर मला वाटत नाही की मी या बालपणीच्या आघातातून कधीच बाहेर पडू शकले असते आणि आज मी तुमच्यामध्ये अशीच उभी असते, असंही स्वाती मालीवाल म्हणाल्या. 'जेव्हा खूप अत्याचार होतात तेव्हा खूप बदल होतात, त्या अत्याचारामुळे तुमच्या आत अशी आग पेटते की तुम्ही योग्य मार्ग दाखवलात तर तुम्ही अनेक मोठी कामे करू शकता, असंही मालीवाल म्हणाल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी DCW आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले. दिल्ली महिला आयोगाने सुमारे १०० महिलांना पुरस्कार प्रदान केले. महिलांप्रती असामान्य धैर्य आणि बांधिलकी दाखविणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.