शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

ही तर माझी घरवापसी - सिद्धू

By admin | Published: January 16, 2017 11:23 AM

मी जन्मत: काँग्रेसीच होतो, माझे वडील काँग्रेसी होते, काँग्रेसकडून ते आमदारही झाले होते, त्यामुळे काल काँग्रेस पक्षाता केलेला प्रवेश ही माझी घरवापसीच आहे

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 16 -  मी जन्मत: काँग्रेसीच होतो, माझे वडील काँग्रेसी होते, काँग्रेसकडून ते आमदारही झाले होते,  त्यामुळे काल काँग्रेस पक्षाता केलेला प्रवेश ही माझी घरवापसीच आहे, असे  काँग्रेमध्ये दाखल झालेले माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. 
 नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयातून  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धू यांनी आपल्या विरोधकांवर चौफेर निशाणा साधला. " कुठलाही राजकीय पक्ष वाईट नाही, पण ते पक्ष चालवणारे वाईट आहेत. अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या बादल यांनी पंजाबची वाट लावली आहे. बादल यांची नियत वाईट आहे." असा घणाघात सिद्धू यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसची तुलना कौशल्येशी तर भाजपची तुलना कैकयीशी केली. 
 बादल सरकारच्या काळात पंजाबच्या झालेल्या दुरवस्थेवरही सिद्धू यांनी बोट ठेवले,  पंजाब आज कर्जबाजारी झाला आहे. जो पंजाब एके काळी हरित क्रांतीसाठी ओळखला जायचा, तो आज सफेद चिट्टा (ड्रग्ज) साठी ओळखला जात आहे, अंमली पदार्थ हे पंजाबचे आजचे वास्तव बनले आहेत, विरोधक टीका करतील, पण त्याची पर्वा मी करणार नाही, ही माझी वैयक्तिक लढाई नाही तर पंजाबच्या स्वाभिमानाची लढाऊ आहे, असेही सिद्धू यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यासाठी आपण तयार असल्याचेही सिद्धू म्हणाले.