'माझा नवा भारत भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल', कपिल सिब्बलांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 03:23 PM2023-05-29T15:23:35+5:302023-05-29T15:24:22+5:30
Kapil Sibbal On PM Modi: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पीएम मोदींच्या वक्तव्यावर सिब्बलांची टीका.
Kapil Sibbal On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(दि.28) नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्या उद्घाटनावरुन विरोधक सातत्याने टीका करत आहेत. यातच आता राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनावेळी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, वीटांनी नाही, तर 1.4 अब्ज लोकांच्या आकांक्षेने आणि स्वातंत्र्याच्या विचारानेच ‘नवा भारत’ घडू शकतो.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या विकासाच्या प्रवासातील "अमर" क्षण असल्याचे वर्णन करताना, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी दावा केला की, ते आत्मनिर्भर आणि विकसित भारताची पहाट चिन्हांकित करेल, जे इतर देशांच्या विकासास प्रेरणा देईल. लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, नवीन संसद भवन "नवीन भारता"ची उंची गाठण्यासाठी काम करण्याचा संकल्प दर्शवतो.
PM :
— Kapil Sibal (@KapilSibal) May 29, 2023
New Parliament building….basis for creation of a new India
Not brick and mortar but freedom of thought with the aspirational underpinnings of 1.4b minds
Where ideas flourish
colours splash
Not :
Saffron
Fractious
Intolerant
Will make my new India !
उद्घाटन समारंभात पंतप्रधानांच्या वक्तव्याचा दाखला देत सिब्बल म्हणाले, "स्वातंत्र्याचा विचार हा माझा नवा भारत घडवू शकतो. फक्त वीटांनी नाही, तर 1.4 अब्ज लोकांच्या स्वातंत्र्याच्या विचारानेच नवीन भारत निर्माण होईल. यात नवनवीन कल्पनांना आकार मिळेल आणि सर्व प्रकारचे रंग विखउरले जातील. हा भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल...''
सिब्बल यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडला
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री असलेले सिब्बल यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात काँग्रेस सोडली. सिब्बल हे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेचे अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी नुकतेच 'इन्साफ' नावाचे व्यासपीठ सुरू केले आहे. त्यांच्या मते अन्यायाविरुद्ध लढा हा या व्यासपीठाचा उद्देश आहे.