बंगळुरू : सोने तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी आपल्याला मारहाण करीत असल्याचे तसेच उपाशी ठेवत असल्याचे आरोप केले आहेत. ती सध्या बंगळुरू येथील सेंट्रल जेलमध्ये आहे. जेलच्या मुख्य अधीक्षकांच्या माध्यमातून डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रान्याने हे आरोप केले आहेत.
रान्याने पत्रात म्हटले आहे की, डीआरआयचे अधिकारी माझ्यावर कोऱ्या पानांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकत होते. नकार दिल्यानंतर त्यांनी १० ते १५ थपडा मारल्या. दबाव आणून त्यांनी टाइपिंग केलेल्या ५० ते ६० पानांवर आणि ४० कोऱ्या पानांवर माझ्या सह्या घेतल्या. तिला ३ मार्च रोजी बंगळुरूच्या केंपेगौडा विमानतळावर सोनेतस्करी प्रकरणी अटक केली होती. (वृत्तसंस्था)