सिमला : जनतेला माझ्याविरुद्ध चिथावण्यासाठी माझे हवे तेवढे पुतळे खुशाल जाळा आणि मेणबत्त्या लावा, पण भ्रष्टाचारमुक्तीच्या व्रतापासून मी जराही ढळणार नाही, अशी ग्वाही देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढविला.हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दुसºया टप्प्यात कांगडा जिल्ह्यातील सभेत मोदी बोलत होते. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीस, ८ नोव्हेंबर रोजी देशभर ‘काळा दिवस’ पाळण्याच्या काँग्रेसच्या कार्यक्रमावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, शहरांच्या नाक्या-नाक्यांवर माझे पुतळे जाळणे आणि मेणबत्त्या लावणे अशा प्रकारच्या निषेधाने तुम्ही मला रोखू शकणार नाही. मी सरदार पटेलांचा चेला आहे. तुमच्या अशा निषेधाला मी मुळीच बधणार नाही. हवे तर हे माझ्याकडून लिहून घ्या!मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरू करून मी कोणतेही पापकेलेले नाही, पण ज्यांनी इतकी वर्षे देशाची लूट केली, त्यांची यामुळेच मोठी अडचण झाली आहे. नेहरू-गांधींच्या घराणेशाहीच्या राजकारणावर अप्रत्यक्ष हल्ला चढवत मोदी म्हणाले की, या लोकांमुळे देश भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरून निघाला आहे. काँग्रेस सडक्या मनोवृत्तीचा झाला असून, त्याचे समूळ उच्चाटन करणे हाच तरणोपाय आहे, असेही ते म्हणाले.नोटाबंदीचे समर्थननोटाबंदीविषयी ते म्हणाले की, यामुळे सामान्यांचे नुकसान झाले नाही, पण ज्यांना लुटलेला पैसा बँकांमध्ये जमा करणे भाग पडले, त्याच लोकांनी आज मला संपविण्याचा चंग बांधला आहे.५ वर्षांत भारत गरिबीमुक्त!नवी दिल्ली: गरिबी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, जातीयवाद व सांप्रदायिकता या सर्वांपासून मुक्त असा भारत २०२२ पर्यंत जगात ताठ मानेने उभा राहील, असे स्वप्नचित्र नीति आयोगाने तयार केले आहे. स्वप्नचित्र पुढीलप्रमाणे : जगातील २० अग्रगण्य शिक्षणसंस्था, ८ टक्के वार्षिक विकास दर, २०४७ पर्यंत जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक, ५०० हून अधिक वस्तीच्या गावात बारमाही रस्ता.
खुशाल जाळा माझे पुतळे! मी भ्रष्टाचारमुक्ती करणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 6:10 AM