Myanmar Earthquake Updates: दोन तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. ७.५ आणि ७ रिश्टर स्केल इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपाने बहुमजली इमारतीची मोठी हानी झाली. काही इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्या. असंख्य लोकांचे जीव गेले असून, थायलंडमध्येही हे धक्के जाणवले. म्यानमार आणि थायलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. पण, म्यानमारमध्ये इतका मोठा भूकंप का झाला?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
म्यानमारमध्ये इतक्या तीव्र क्षमतेचा भूकंप का झाला? यांचे उत्तर तेथील भूगर्भात दडलं आहे. भूकंपाचे कारण समजून घेण्यासाठी तिथल्या भूगर्भाची रचना समजून घेणे आवश्यक आहे.
भूगर्भात काय होते?
म्यानमारमध्ये जमिनीचा पृष्ठभाग १५ छोट्या आणि मोठ्या प्लेट्सनी बनलेला आहे. या प्लेट्स स्थिर आहेत, असे नाही. या प्लेट्स हलतात. ज्यावेळी या प्लेट्सची हालचाल होते, तेव्हा एकमेकांना धडकात आणि भूकंपाची कंपणे तयार होतात.
हेही वाचा >>बँकॉकसारखा भूकंप महाराष्ट्रात झाला तर...; चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र...
भूगर्भात असलेल्या प्लेट्स संथपणे हलत असतात. पण घर्षण होऊन त्या अडकतातही. प्रचंड ताण पडल्यानंतर ऊर्जा तयार होते आणि त्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर हादरे जाणवतात.
म्यानमारमधील भूकंपाचे कारण
आता म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी आहे. ते अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र मानले जाते. याचे कारण म्हणजे सागांग फॉल्ट! सागांग फॉल्ट म्हणजे जिथे पृथ्वीचे दोन भूभाग एक दुसऱ्यावरून घसरतात.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हे घर्षण दरवर्षी ११ MM ते १८ MM इतके होत असते. दोन्ही भूभाग घसरत राहिल्याने नेहमी भूगर्भात तणाव वाढतो. आता हे भूभाग घसरण्याचा वेग प्रतिवर्ष १८ एमएमपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अधिक ऊर्जा जमा होत आहे.
हीच ऊर्जा एका मोठ्या भूकंपाच्या स्वरूपात बाहेर पडते. जसे की शुक्रवारी म्यानमारमध्ये घडले. म्हणजे पहिला धक्का ७.५ रिश्टर स्केल, तर दुसरा धक्का ७ रिश्टर स्केल इतका होता. त्यामुळेच म्यानमारमध्ये इतका विध्वंस झाला आहे.