शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

"घरीच कोरोना टेस्ट करणाऱ्या CoviSelf किटचे उत्पादन वाढणार, दर आठवड्याला तयार होणार 10 कोटी युनिट्स"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 2:03 PM

coviself test kit : घरात स्वत: ची टेस्ट करण्याच्या या किटला 'कोविसेल्फ' (CoviSelf) म्हणतात आणि संसर्गाची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या टेस्टचा निकाल  15 मिनिटांच्या आत दाखविला जाऊ शकतो.

ठळक मुद्देटेस्ट क्षमता वाढविण्यासाठी या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे.

मुंबई : पुढील काही महिन्यांत मागणीनुसार होम-बेस्ड कोरोना टेस्ट किटच्या आठवड्यातून दहा कोटी युनिट उत्पादन करण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे, असे भारतीय डायग्नोस्टिक्स कंपनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने (मायलॅब) शुक्रवारी म्हटले आहे. मायलॅबचे सीईओ राहुल पाटील म्हणाले की, 'कंपन्याद्वारे निर्मित टेस्ट किटमध्ये सरकारी संस्था आणि कंपन्यांनी रस दाखविला आहे. कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय कोणताही व्यक्ती कोरोनाची टेस्ट करु शकते आणि हे खेड्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.' (mylab can ramp up production of coviself test kit to 10 crore units per week)

तज्ज्ञांचा असा दावा आहे की, ग्रामीण भागातील टेस्टिंगच्या अभावामुळे देशात संसर्ग आणि मृत्यू हे अधिकृत अंदाजापेक्षा पाच ते दहा पट जास्त असू शकतात. राहुल पाटील म्हणाले की, कंपनी येत्या दोन आठवड्यांत साप्ताहिक उत्पादन 10 कोटीपर्यंत वाढवू शकते आणि मागणीनुसार पुढील चार ते सहा आठवड्यांत 10 कोटीपर्यंत पोहोचण्याची क्षमता विकसित करेल.

घरात स्वत: ची टेस्ट करण्याच्या या किटला 'कोविसेल्फ' (CoviSelf) म्हणतात आणि संसर्गाची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या टेस्टचा निकाल  15 मिनिटांच्या आत दाखविला जाऊ शकतो. टेस्ट क्षमता वाढविण्यासाठी या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे.  याची प्रति युनिट किंमत 250 रुपये आहे. याद्वारे हे देखील सुनिश्चित केले जाईल की ,रूग्ण शक्य तितक्या लवकर आयसोलेशनमध्ये राहू शकेल आणि अशा प्रकारे संक्रमणाचा प्रसार कमी होऊ शकेल.

एका दिवसांत 10 लाख युनिटचे उत्पादनअलीकडेच या कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक श्रीकांत पटोले म्हणाले होते, 'आम्ही लोणावळा येथील आमच्या केंद्रात दिवसाला दहा लाख युनिट्स तयार करत आहोत. पुढील 10 दिवसात आमच्याकडे एक कोटी युनिट तयार होतील आणि त्यानंतर आम्ही 1 जूनला ते राष्ट्रीय स्तरावर जाहीर करू. याचबरोबर, कंपनीकडे उत्पादन करण्यासाठी पुरेसा कच्चा माल आहे आणि येत्या पंधरवड्यापर्यंत हे उत्पादन दररोज 15 लाख युनिटपर्यंत वाढविले जाईल.'

(Corona Test at Home: घरच्या घरी CoviSelf kit ने चाचणी कशी करायची? कोणते अ‍ॅप वापरायचे; कधी येणार, माहिती जाहीर...)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य