अमरावती (आंध्र प्रदेश) - देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रहस्यमय आजारामुळे लोक मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, काल एका रात्रीत सुमारे १४० रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, हा नेमका कोणता आजार आहे. याचा उलगडा डॉक्टरांनाही झालेला नाही.चिंताजनत बाब म्हणजे रुग्णांची संख्या वाढण्यामागचे कारण डॉक्टरांनाही कळलेले नाही. गेल्या शनिवारी एलुरू शहरात चक्कर आणि मळमळ या लक्षणांनंतर मुलांसह एकूण १८ जण बेशुद्ध झाले होते. मात्र आजारी पडल्यानंतर काही क्षणा्ंतच ते बरे झाले होते. वन-टाऊन क्षेत्रात अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुठलातरी रहस्यमय आजार पसरल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली होती.
आंध्र प्रदेशमध्ये पसरतोय रहस्यमय आजार, एका रात्रीत सापडले १४० रुग्ण
By बाळकृष्ण परब | Published: December 07, 2020 7:46 AM
Andhra Pradesh News : देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देगेल्या शनिवारी एलुरू शहरात चक्कर आणि मळमळ या लक्षणांनंतर मुलांसह एकूण १८ जण बेशुद्ध झाले होते वन-टाऊन क्षेत्रात अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुठलातरी रहस्यमय आजार पसरल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झालीएलुरू शहरातील सर्व परिस्थिती सामान्य आहे तसेच घाबरण्यासारखे काही नाही, असे, उपमुख्यमंत्री श्रीनिवास यांनी रविवारी सांगितले