वायनाड : केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलन घटनेच्या ११व्या दिवशीही ११३ जण बेपत्ता असून शाेधमाेहीम सुरूच आहे. भूस्खलन प्रभावित भागात सकाळी १० वाजून १५ मिनिटांच्या जमिनीखालून माेठे आवाज आले. या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. अधिकारी भूकंपीय हालचालीच्या नाेंदी तपासत आहेत.
स्वत:चे दु:ख विसरून मदतीला धावली दीपा -अनेकांचे बळी घेणाऱ्या भूस्खलनाच्या घटनेत अनेकांनी आपले आप्तेष्ट गमाविले. मात्र, स्वत:चे दु:ख विसरून दीपा जाेसेफ ही रुग्णवाहिकाचालक पीडितांच्या वेदना पाहून त्यांच्या मदतीसाठी धावली. दीपा यांच्या मुलीचे १० महिन्यांपूर्वी रक्ताच्या कर्कराेगाने निधन झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका चालविणे बंद केले हाेते. मात्र वायनाड दुर्घटनेनंतर त्यांनी रुग्णवाहिका चालविण्यास सुरूवात केली. केरळच्या त्या पहिल्या महिला रुग्णवाहिकाचालक आहेत.