एन. डी. तिवारींच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:21 AM2019-04-17T08:21:34+5:302019-04-17T09:41:21+5:30
रोहित यांच्या नाकातून रक्त आले होते. त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन करण्यासाठी एम्समध्ये नेण्यात आले होते.
नवी दिल्ली : उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या मुलाचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी रोहित शेखर तिवारी डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रोहित हे त्यांची पत्नी अपूर्वा शुक्ला आणि आई उज्ज्वला शर्मा यांच्यासोबत राहत होते.
रोहित यांच्या नाकातून रक्त आले होते. त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन करण्यासाठी एम्समध्ये नेण्यात आले होते. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेज किंवा हृदयविराच्या झटक्याने झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण समजू शकणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रोहित तिवारी यांच्या आई उज्ज्वला यांनी सांगितले की, रोहितचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला आहे. आपल्याला कोणावरही संशय नाही. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण मी नंतर सांगेन.
रोहित यांचे लग्न गेल्या वर्षीच्या मे मध्ये झाले होते. मॅक्स हॉस्पिटलमध्ये एन डी तिवारी यांच्या सर्व कुटुंबावर उपचार केले जातात. रोहितला उच्च रक्तदाब, मधुमेहसारखा कोणताही आजार नव्हता. मात्र, काही वर्षांपूर्वी ते नातेवाईकाला भेटण्यासाठी हॉस्पटलमध्ये गेले असता त्यांना चक्कर आली होती.
मोठ्या वादानंतर मुलगा म्हणून स्वीकार
रोहित याने 12 एप्रिलला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसमध्ये सहभागी होऊन राजकीय इनिंग आजमावणार असल्याचे म्हटले होते. काही वर्षांपूर्वी एन. डी. तिवारी यांचे वयाच्या 89 व्या वर्षीचे लग्न प्रकरण गाजले होते. न्यायालयात बराच काळ चाललेल्या वादानंतर एन. डी. तिवारी यांनी रोहित हा त्यांचाच मुलगा असल्याचे मान्य केले होते. तसेच 89 व्या वर्षी त्यांनी उज्ज्वला यांच्याशी लग्नही केले होते. रोहित हे 2017 मध्ये भाजपामध्ये सहभागी झाले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एन डी तिवारी यांचे निधन झाले होते.
[8:03 AM, 4/17/2019] Sayali Shirke Lokmat Onl:
Ujjwala Tiwari on her son Rohit Shekhar (son of late N D Tiwari)'s death: His death is natural,I have no suspicion but I will reveal later what circumstances led to his death pic.twitter.com/k8bq60Jrxn
— ANI (@ANI) April 16, 2019