टेमजेन इम्ना अलॉन्ग (Temjen Imna Along) ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि अनेकदा नागालँडचे कौतुक करणारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. 11 जानेवारी रोजी, मंत्र्यांनी ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या लोंगवा नावाच्या गावाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या गावाची एक खासियत आहे.
हे गाव भारत-म्यानमार सीमेजवळ (Indo-Myanmar border) आहे. लोंगवा गावात कोन्याक नागा जमातीची वस्ती आहे आणि तेथील रहिवाशांना दुहेरी नागरिकत्वाची परवानगी आहे. अनघच्या घराच्या अनोख्या स्थानामुळे, झोपण्याचे ठिकाण भारतात आणि स्वयंपाकघर म्यानमारसारख्या इतर भागात आहे. अनघ असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या या घराची चर्चा रंगली आहे.
इम्ना अलॉन्गने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये अनघचे घर दाखवले आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "ओएमजी. हा माझा भारत आहे. सीमा ओलांडण्यासाठी या माणसाला फक्त त्याच्या बेडरूममध्ये जावे लागते. हे भारतात झोपणे आणि म्यानमारमध्ये खाण्यासारखे आहे."
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. ट्विटर युजर्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मला हे कधीच माहीत नव्हते असं म्हटलं आहे दुसर्या युजरने यावर अप्रतिम अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओची आता चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"