हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा सर्वात मोठा वार्षिक महोत्सव असून, त्याचा आनंद लुटण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक येथे येतात. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेण्यात येतो. राज्याचा पर्यटन विभाग आणि कला व संस्कृति विभागातर्फे किसामा या गावात त्याचे आयोजन करण्यात येते. राज्याची राजधानी कोहिमापासून १२ कि.मी.वर असलेले हे गाव नागांचे जीवन आणि त्यांच्या इतिहासाचे दर्शन घडविते. हॉर्नबिल महोत्सव सात दिवस चालतो. त्यात नागा जमातीची समृद्ध जीवन संस्कृति दाखविली जाते. नागा लोकांच्या टोपीत हॉर्नबिल पक्षाचे पंख असतात. त्यामुळे या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल ठेवण्यात आले आहे.
नागालँडचा हॉर्नबिल महोत्सव
By admin | Published: January 18, 2017 5:26 AM