नवी दिल्ली : एम. नागेश्वर राव यांच्या सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, त्यांनी २० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शनिवारी रात्री उशिरा अचानक बदल्या केल्या. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणाºया अधिकाºयाचीही बदली झाली आहे.सीबीआयचे नवे संचालक निवडण्यासाठी २५ जानेवारी रोजी उच्चाधिकार निवड समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान, सरन्यायाधीश व लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता हे या समितीचे सदस्य असतात.या बैठकीला तीन दिवस शिल्लक असताना राव यांच्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार असताना, त्यांनी सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाºयांच्या घाईघाईने बदल्या करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राव यांनी ज्या अधिकाºयांची बदली केली, त्यापैकी १३ जण पोलीस अधीक्षक दर्जाचे असून, अन्य सात जण सहायक अधीक्षक आहेत. आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, तेव्हाही राव यांना हंगामी संचालक केले होते. तेव्हाही त्यांनी अधिकाºयांच्या बदल्या केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलोक वर्मा यांनी पुन्हा संचालकपदाची सूत्रे घेताच त्यांनी राव यांनी केलेल्या बदल्या रद्दकेल्या.>सीबीआयमध्ये नाराजीसीबीआयचा नवा संचालक आठवडाभरात नेमला जाण्याची शक्यता असूनही हंगामी अधिकाºयाने इतक्या बदल्या केल्यामुळे सीबीआयमध्ये नाराजी आहे. राव यांनी याआधी ए. के. बस्सी नावाच्या अधिकाºयाची पोर्ट ब्लेअर येथे बदली केली होती. त्याला बस्सी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्याचाही निर्णय व्हायचा आहे.
सीबीआयचे नवे संचालक नेमण्याआधीच नागेश्वर राव यांनी केल्या २० बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:20 AM