नागपूर- महाराष्ट्राचा व्याघ्रदूत हा माझा सन्मान -अमिताभ बच्चन
By admin | Published: August 12, 2015 12:35 AM
सूचना- सदर बातमी मुंबई डेटलाईनने केली आहे
सूचना- सदर बातमी मुंबई डेटलाईनने केली आहे११ टायगर या नावाने फोटो टाकला आहे महाराष्ट्राचा व्याघ्रदूत हा माझा सन्मानअमिताभ बच्चन : वनमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली महानायकाची भेटमुंबई- महाराष्ट्राचा व्याघ्रदूत म्हणून सरकारने दिलेली संधी हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या माध्यमातून व्याघ्रसंवर्धन आणि संरक्षणाच्या कामात मी माझे सक्रिय योगदान देऊ शकेल. सोशल मीडियावरील माझ्या ४२ दशलक्ष चाहत्यांपर्यंत व्याघ्रदूत म्हणून माझी भूमिका समर्थपणे पोहचेल, याचा मला विश्वास आहे. महाराष्ट्राचे व्याघ्रवैभव आपण जगाच्या कानाकोपर्यात पोहचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू, अशी ग्वाही राज्याचे पहिले व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.मंगळवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत बच्चन यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. व्याघ्रदूत होण्यासाठी दिलेल्या होकाराबद्दल शासनाच्यावतीने त्यांचे आभार मानले. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी परिपूर्ण योजना आणि आराखडा वन खात्याने तयार करावा, अशी सूचनाही बच्चन यांनी यावेळी केली. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, वनवैभव तसेच वनविभागाच्या विविध उपक्रमांबाबतची विस्तृत माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. या शतकातील महानायकाच्या सहकार्याने राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर निितपणे अधोरेखित करू, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. बच्चन यांना वाघाची प्रतिकृति व वनखात्याची विविध पुस्तके भेट देण्यात आली. वन विभागाचे सचिव विकास खारगे, सपना मुनगंटीवार, आमदार संजय धोटे, डॉ. मकरंद व्यवहारे, सामाजिक वनीकरणाचे महासंचालक झा, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)