शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

मानसिकता बदलेल तेव्हाच समाज सुधारेल नागराज मंजुळे : भारत व पाकच्या पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

जळगाव- आपण बहिणाबाई चौधरी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फक्त लिहितो... वाचतो... संधी मिळाली तर आवेशात किंवा देश बदलून टाकू अशा आविर्भावात कविता म्हणतो... पण या थोरांचे विचार प्रत्यक्षात येत नाहीत. कारण मानसिकता बदललेली नाही. आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत जातपात नष्ट होणार नाही, समाज सुधारणार नाही, असे मत कवी,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
उमवितील विचारधारा प्रशाळेंतर्गत कार्यरत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन वसंशोधनकेंद्राच्यावतीनेसोमवारी सकाळी अधिसभा सभागृहात मंजुळे यांचा मी, कविता आणि चित्रपट या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम, कुलसचिव अशोक महाजन, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.आशुतोष पाटील उपस्थित होते.
दोन्ही पंतप्रधानांनी सीमेवर रात्र काढावी
सियाचीनमध्ये सैनिकांना वीरमरण आले. भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तेथे जाऊन एक रात्र कर्तव्य करावे... मग सीमा प्रश्न कसा सुटत नाही, ते पहा, असेही नागराज मंजुळे उपहासाने म्हणाले.
मंदिरात जातो, पण बांधकाम पाहायला
मी मंदिरात देवदर्शनासाठी जाणे कधीच सोडून दिले. मंदिरांमध्ये गेले तर तेथील बांधकाम पाहतो. माझ्या पूर्वजांनी मोठे कष्ट घेऊन मंदिरे बांधली. त्यांनी असे सुंदर बांधकाम कसे केले असेल, असे प्रश्न मला पडतात. मंदिरांना लावलेल्या दगडांना हात लावून मला आनंद मिळतो. पण आपण जुन्या मंदिरांना रंग मारून आपली भलावण करून घेण्यात मोठेपण मानतो... हा विचार बदलायला हवा, असेही मंजुळे म्हणाले.
जसे बाबासाहेब मंदिरात गेले, तसे शनिदेवाचे दर्शन घ्या
अलीकडे शनिदेवाच्या दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला जातो. महिलांनी शनिदेवाचे दर्शन घ्यायला हवे. कुठलीही भीती ठेवू नका, जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंदिरात दर्शनासाठी गेले, तसे जाऊन दर्शन घ्या, असेही नागराजमंजुळे म्हणाले.
देशद्रोह, शनिचौथर्‍यापेक्षा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा
मुलांनी देशद्रोह केला...., शनिचौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले असे प्रश्न सध्याचर्चेत आहे. पण अजूनही काही गरिबांची मुले क्षयरोगाने मृत्यू पावत आहेत. आपल्या मुलाबाळांना क्षय रोग आहे हे अजूनही अनेक गरिबांना माहीत होत नाही... ते त्यांना उपचारासाठी नेऊ शकत नाहीत. अनेक कुटुंबांना वन्य प्राणी खाऊन जगावे लागते. ही स्थिती अजूनही आहे. हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्नही नागराज मंजुळे यांनी केला.