शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

नजमा हेपतुल्ला, पुरोहित यांच्यासह चार नवे राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 6:58 AM

भाजपाच्या चार ज्येष्ठ नेत्यांची बुधवारी राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील बनवारीलाल पुरोहित तसेच माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा समावेश आहे.

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

भाजपाच्या चार ज्येष्ठ नेत्यांची बुधवारी राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील बनवारीलाल पुरोहित तसेच माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा समावेश आहे. बनवारीलाल पुरोहित यांची आसामचे राज्यपाल म्हणून तर हेपतुल्ला यांची मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.हेपतुल्ला या षण्मुगनाथन यांची जागा घेतील. षण्मुगनाथन मेघालयचे राज्यपाल असून, त्यांच्याकडे मणिपूरचाही कार्यभार होता. नागालॅण्डचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्याकडे आसामचाही कार्यभार होता. राजस्थानातील व्ही. पी. सिंह बदनोरे यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने ते कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. हरियाणाचे राज्यपाल सोलंकी यांच्याकडे पंजाबचाही कार्यभार होता. दिल्लीतील जगदीश मुखी यांची अंदमान आणि निकोबारच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. ते लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) ए. के. सिंग यांची जागा घेतील. के. रोसय्या (तामिळनाडू) आणि राम नरेश यादव (मध्यप्रदेश) यांचा कार्यकाळ अनुक्रमे ३१ आॅगस्ट आणि ८ सप्टेंबर रोजी संपत असून, तेव्हा आणखी दोघांना राज्यपाल म्हणून नेमले जाईल. या दोघांची डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात नियुक्ती झाली होती.नजमा हेपतुल्ला यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शाहनवाज हुसैन यांना राज्यसभेवर घेतले जाण्याची शक्यता आहे.