बिहारमधील नालंदा येथे एका कपलचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी झालेलं प्रेम कुंकू लावताच संपल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. अस्थावां पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनी गावात राहणारा ज्ञानी कुमार आपल्या बहिणीला परीक्षा देण्यासाठी बिहार शरीफ येथील एका केंद्रात घेऊन आला होता. त्याने आपली प्रेयसी गुडिया कुमारीला भेटण्यासाठी बोलावलं.
मुलीच्या कुटुंबीयांना या भेटीची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना पाहून त्यांचे लग्न लावून दिले. मात्र, ही बाब मुलाच्या घरच्यांना कळताच त्यांनी लग्नाला विरोध केला. मुलाने त्यावेळी सरळ सांगितले की, तो या लग्नासाठी तयार नाही. जबरदस्तीने त्याचं लग्न लावलं गेलं आहे. त्यानंतर संधी साधून तो तेथून पळून गेला. ज्ञानी कुमारला मुलीच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने बाईकवर बसवले आणि कोर्टात नेले.
कोर्टात नातेवाईकांनी जबरदस्तीने त्याचे त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून दिले. मुलीला कुंकू लावायला सांगितलं. यावर ज्ञानी कुमारने मला हे लग्न करायचं नव्हतं असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे, तरुणीचे म्हणणे आहे की, त्यांची फेसबुकवर सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली, नंतर मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघे तासनतास बोलू लागले. शनिवारी प्रियकराने तिला फोन करून भेटायला बोलावले.
ज्ञानी कुमार कामानिमित्त बाहेर जाणार होता, म्हणून मी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्याने लग्न करण्यास होकार दिला. प्रेयसीने सांगितले की, दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले आहे. मात्र ही बाब त्याच्या पालकांना समजताच तेही येथे आले. त्याने लग्नाला विरोध केला आणि संधी पाहून तरुण तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीचे त्याचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"