नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठपेची शिक्षा भोगत असलेल्या एस. नलिनी हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सात दोषींच्या सुटकेआधी तामिळनाडू सरकारला केंद्र सरकारशी विचारविनियम करण्याचे बंधनकारक करणारी कायद्यातील तरतूद अमान्य घोषित करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
नलिनी हिने याचिकेत सीपीसीच्या कलम 435(1) ला आव्हान दिले आहे. या कलमानुसार एखाद्या प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला असल्यास त्या प्रकरणातील दोषींची वेळेआधी सुटका करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारशी विचारविनिमय करणो आवश्यक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)