शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Nambi Narayanan ISRO Spy Case : 'नंबी नारायणन यांच्यावरील ISRO हेरगिरीचे आरोप खोटे', CBI ची केरळ उच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 1:24 PM

Nambi Narayanan ISRO Spy Case: प्रसिद्ध शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्यावर पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता.

Nambi Narayanan ISRO Spy Case: 1994 च्या कुप्रसिद्ध इस्रो(ISRO) हेरगिरी प्रकरणात एरोस्पेस शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांची अटक बेकायदेशीर होती, कुठलीही वैज्ञानिक माहिती लीक झाली नाही. त्यांना खोट्या हेरगिरी प्रकरणात अडकवण्यात आलं, अशी मोठी माहिती सीबीआयने(CBI) शुक्रवारी केरळउच्च न्यायालयात दिली. नंबी नारायणन हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमधील प्रमुख लिक्विड प्रोपेलंट इंजिन वैज्ञानिक होते. 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय तपास करत असलेल्या लोकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर नव्याने सुनावणी झाली. सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं की, हेरगिरी प्रकरणात नंबी नारायणन यांना अडकवण्याचा आंतरराष्ट्रीय कट होता. या संबंधी केस डायरी मंगळवारी प्रसिद्ध केली जाईल. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आरोपींची कोठडीत चौकशी आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये.

काय होतं प्रकरण?नंबी नारायणन यांना हेरगिरी प्रकरणात गोवण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मालदीवच्या नागरिकाच्या माध्यमातून पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. 1998 मध्ये सीबीआय न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण, यादरम्यान त्यांनी सहयोगी शास्त्रज्ञ डी. शशीकुमार आणि इतर चार जणांसह 50 दिवस तुरुंगात घालवले.

नंबी नारायणन यांचा आरोप1994 च्या खटल्यात नंबी नारायणन यांना त्यांचं नाव या खटल्यातून पूर्णपणे काढून टाकायचं होतं. तसेच, नुकसान भरपाईसाठी आणि त्यांना फसवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी त्यांनी कायदेशीर लढाईही लढली. त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये आरोप केला आहे की, ज्या कटकारस्थानांची आणि लोकांची आता चौकशी केली जात आहे, ते अमेरिकेची गुप्तचर संस्था (CIA) सोबत भारताच्या अंतराळ कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी काम करत होते.

नंबी यांच्या आयुष्यावर चित्रपनंबी नारायणन यांनी त्यांच्या आयुष्याव एक पुस्तक लिहिले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच अभिनेता आर माधवन याने नंबी यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही काढला. त्या चित्रपटात नंबी यांच्या आयुष्यातील संपूर्ण संघर्ष दाखवण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय माधवनन यानेच केला. हा चित्रपट आता ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे.

टॅग्स :Rocketry The Nambi Effect Movieरॉकेट्री : द नंबी इफेक्टCBIगुन्हा अन्वेषण विभागKeralaकेरळHigh Courtउच्च न्यायालय