शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

नीट परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थिनीला उतरवायला लावलं अंतर्वस्त्र

By admin | Published: May 07, 2017 11:24 PM

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षे(NEET)त अनुचित प्रकार थांबवण्याच्या नावाखाली लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना मनस्तापाला सामोरं जावं लागलं

ऑनलाइन लोकमतकन्नूर, दि. 7 - सरकारी आणि वैद्यकीय कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षे(NEET)त अनुचित प्रकार थांबवण्याच्या नावाखाली लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. एका विद्यार्थिनीला तर नीटच्या परीक्षेला बसण्यापूर्वी तिचं अंतर्वस्त्र काढण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नीटची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थिनीनं परीक्षा केंद्र अधिका-यांनी अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचं उघड केलं आहे. तर दुस-या एका विद्यार्थिनीला जिन्सचं बटन काढण्यास सांगण्यात आलं होतं. विद्यार्थिनीच्या वडिलांनीच हे उघडकीस आणलं आहे. 
सीबीएसईकडून रविवारी नीट परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते १ ही परीक्षेची वेळ होती व त्यासाठी सकाळी ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आत यावे, अशी प्रवेशपत्रावरच अट होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आधार कार्डदेखील आणणे सक्तीचे करण्यात आले होते. परंतु विविध कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला. काही विद्यार्थी बाहेरगावाहून आले होते, तर अनेकांना परीक्षा केंद्रच दूर मिळाल्यामुळे ते शोधताना त्यांना उशीर झाला. नियमांनुसार विद्यार्थी वेळेत आले नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी गमवावी लागल्याने काही परीक्षा केंद्रावर पालकांनी आरडाओरड केली. विद्यार्थी आणि पालकांनी शाळा प्रशासनाकडे विनंती करूनही त्याचा उपयोग झाला नाही. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.