नवी दिल्ली - गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात झालेल्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर चीनविरोधातभारतात संतापाची लाट आहे. अनेक ठिकाणी चीनच्या सामानांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी नि:शस्त्र भारतीय जवानांवर लोखंडाच्या सळ्या, दांडके, दगडं अशा हत्यारांनी हल्ला केला.
या हल्ल्यात झालेल्या २० शहीद जवानांची नावं जाहीर करण्यात आली आहे. ही नावं पुढील प्रमाणे आहेत.
- कर्नल संतोष बाबू (हैदराबाद)
- नंदुराम सोरेन (मयुरभंज)
- मनदीप सिंग (पटियाला)
- सतनाम सिंग (गुरुदासपूर)
- हवालदार के पालानी (मदुराई)
- हवालदार सुनील कुमार (पटना)
- हवालदार बिपुल रॉय(मेरठ शहर)
- दिपक कुमार (रेवा)
- राजेश ओरंग (बिरघम)
- कुंदनकुमार ओझा (साहीबगंज)
- गणेश राम (कांकेर)
- चंद्रकांता प्रधान (कंधलमाल)
- अंकुश (हमीरपूर)
- गुरुबिंदर (संगरुर)
- गुरुतेज सिंग (मानसा)
- चंदन कुमार (भोजपूर)
- कुंदन कुमार (साहरसा)
- अमन कुमार (समस्तीपूर)
- जय किशोर सिंग(वैशाली)
- गणेश हंसदा (पूर्व सिंगभूम)
सध्या देशात काय सुरु आहे?सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉईंट १४ च्या डोंगराळ भागात चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोठमोठे दगड भारतीय सैनिकांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा सामना केला. आजूबाजूला संरक्षण करण्याची संधीही मिळाली नाही. सोमवारी सकाळी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे मृतदेह सोपवले. या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार चीनचे ४० सैनिक मारल्याची चर्चा त्यांच्या सैनिकांमध्ये सुरु आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती
...अन् त्याचदिवशी चीनच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारचा ७,६०० कोटींचा करार
शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी
खोदकामात २ युवकांना सापडला ८०० वर्ष जुना खजिना; बाजारात विकायला गेले अन्....