नितीन अग्रवाल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या नमो अॅपवरील डेटाच्या कथित गैरवापरावरून रविवारी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली. या अॅपवरील डेटा अमेरिकेत विकली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपाने लगेच पलटवार केला व गांधी व काँग्रेसला तंत्रज्ञानाविषयी काहीही कळत नसल्याचेच यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचा टोमणा मारला.फेसबुकवरील कोट्यवधी लोकांचा डेटा चोरुन तिचा वापर भारतातील निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्याक रिता केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी काँग्रेसने संधान बांधले होते असा आरोप भाजपने केल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये वाक्युद्ध पेटले आहे. नमो अॅप वापरणाऱ्या असंख्य भारतीयांच्या डेटाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा इलियट एल्डरसन या फ्रेंच हॅकरने केल्यानंतर राहुल गांधी यांनी टिष्ट्वट करुन पंतप्रधान मोदी ही माहिती अमेरिकन कंपन्यांना देत असल्याचा आरोप केला. जेव्हा राहुल गांधी यांच्या अनुयायांनी टिष्ट्वटरवर ‘डिलिटनमोअॅप' हा ट्रेंड शनिवारी सुरु केला त्याचा परिणाम उलटाच झाला. नमो अॅप डाऊनलोड करुन घेण्याचे प्रमाण व लोकप्रियता दोन्ही वाढले, असा दावाही भाजपाने केला.काय म्हणाले राहुल गांधी?राहुल गांधी यांनी उपरोधिक शैलीत टिष्ट्वट करुन म्हटले आहे ‘माझे नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. माझे अधिकृत अॅप वापरणाºयांची सर्व माहिती मी अमेरिकी कंपन्यातील मित्रांना देतो.'भाजपाने काय दिले उत्तर?राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटला भाजपने प्रत्युत्तर दिले की, राहुल गांधी यांची नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी होऊच शकत नाही हे सर्वांनाचमाहिती आहे. राहुल गांधीयांनी आक्षेप घेतल्यानंतर उलट नमो अॅपची लोकप्रियता पूर्वीपेक्षा जास्त वाढली.राहुल गांधी यांच्या एका टिष्ट्वटमुळे भाजपा खवळली आहे. भाजपाने म्हटले की, केंब्रिज अॅनालिटिका कंपनीचे चौर्यकर्म उघडकीस आल्यापासून राहुल गांधी इतके उद्विग्न झाले आहेत की त्या मुद्द्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते रोज आटापिटा करीत आहेत. शनिवारी त्यांनी न्याययंत्रणेचा मुद्दा उपस्थित केला होता आणि आज ते नमो अॅपवर घसरले आहेत. तंत्रज्ञानासंदर्भात राहुल गांधी व त्यांच्या पक्षाला शून्य माहिती आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
‘नमो’ अॅपच्या डेटावरून काँग्रेस-भाजपात जुंपली, राहुल गांधींच्या आरोपाने खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:25 AM