संपर्क व माहिती मंत्री रविशंकर प्रसाद पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात योगासन करताना.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मेरठमधील कार्यक्रमात उपस्थित होते.
कोच्चीतील कार्यक्रमात सुरेश प्रभू सहभागी झाले होते
लखनौमधील योगकार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या योग सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही सहभागी झाले होते.
केंद्र सरकार व दिल्ली सरकारमध्ये सध्या संघर्ष सुरु असला तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राजपथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला.
भाजपा नेत्या किरण बेदी यांनीही राजपथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला. दिल्लीत योगाचा कार्यक्रम पाऊस सुरु झाल्याचे ट्विट त्यांनी केले. मात्र यावरुन सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडवली गेल्याने किरण बेदी यांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थ राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनीदेखील राजपथावरील कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जयंत सिन्हा यांनीदेखील उपस्थितांसोबत सेल्फी काढली.
राजपथावरील कार्यक्रम संपल्यावर मोदींनी कार्यक्रमात आलेल्या बच्चेकंपनीशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी बच्चे कंपनीमध्येही उत्साह संचारला होता.
योगासन करण्यासाठी राजपथावर येताच एका तरुणींने मोदींसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींनी तिला विनम्रपणे नकार दिला. यानंतर त्या तरुणीने मोदींच्या मागे बसून योगासन करायला सुरुवात केली. अखेरीस मोदींच्या सुरक्षा रक्षकांनी तिला तिथून हटवले.
राजपथवरील कार्यक्रमात योगासन करणारी तरुणाई.
योगासनांचे विविध प्रकार करताना नरेंद्र मोदी
योग सादर करताना नरेंद्र मोदी
रविवारी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दिल्लीतील राजपथ येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांमध्ये योग करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळाती अन्य मंत्रीही योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.