तीन शिंगे, तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचे निधन; मंदिराच्या आवारातच अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 09:02 AM2022-11-19T09:02:34+5:302022-11-19T09:03:16+5:30

जटाशंकर धाम बुंदेलखंड प्रदेशातील बिजावर तहसीलपासून जवळपास 15 किमी अंतरावर आहे.

nandi bull with three horns and three eyes passed away in chhatarpur, madhya pradesh | तीन शिंगे, तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचे निधन; मंदिराच्या आवारातच अंत्यसंस्कार

तीन शिंगे, तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचे निधन; मंदिराच्या आवारातच अंत्यसंस्कार

googlenewsNext

छतरपूर : वेदांनी बैलाला धर्माचा अवतार मानले आहे. वेदांमध्ये गायीपेक्षा बैलाला अधिक मौल्यवान असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, जेव्हा नंदी बैलाचा विचार केला जातो, तेव्हा तो भगवान शिवाच्या प्रमुख गणांपैकी एक आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम येथील एका नंदी बैलाचे निधन झाले. यानंतर या नंदी बैलाचे हिंदू विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदी बैलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदी बैलाचा अंत्यसंस्कार विधींनुसार ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्षे नंदी ज्या ठिकाणी बसत असे. त्याच ठिकाणी नंदीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मंदिर समितीने ज्या ठिकाणी नंदी नेहमी बसायचा, त्याच ठिकाणी खड्डा खोदून नंदीची समाधी तयार केली. 

हा नंदी बैल 15 वर्षांपूर्वी जटाशंकर येथे फिरत फिरत आला होता.  तीन डोळे आणि तीन शिंगांमुळे हा बैल जटाशंकर धाममध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. जेव्हापासून हा बैल याठिकाणी आला. तेव्हापासून लोकांनी त्यांचे नाव नंदी ठेवण्यात आले, जे काही भक्त जटाशंकर धामला येत असत. ते थोडावेळ नंदीजवळ थांबायचे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत होते. 

नंदी बैलाच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन कीर्तन केले. तसेच, ज्या ठिकाणी नंदीला समाधी देण्यात आली आहे, त्या जागेचा समिती स्मृतिस्थळ म्हणून विकास करणार आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी सांगितले. 

येथील कुंडांतील पाण्याचे तापमान हवामानाच्या विरुद्ध 
दरम्यान, जटाशंकर धाम बुंदेलखंड प्रदेशातील बिजावर तहसीलपासून जवळपास 15 किमी अंतरावर आहे. आजूबाजूला सुंदर पर्वतांनी वेढलेले शिवमंदिर आहे. हे मंदिर धार्मिक श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. या मंदिरावर तीन लहान पाण्याची टाकी आहेत, ज्यांचे पाणी कधीच संपत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कुंडांतील पाण्याचे तापमान नेहमीच हवामानाच्या विरुद्ध असते. तसेच, येथील पाण्यात आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते.

Web Title: nandi bull with three horns and three eyes passed away in chhatarpur, madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.