नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:51 AM2021-03-29T04:51:32+5:302021-03-29T04:51:44+5:30

Narang attack case News : याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे.

Narang attack case: FIR against 300 people | नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार

नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार

Next

- बलवंत तक्षक 
चंदीगड : पंजाबमध्ये भाजपचे अबोहर मतदारसंघाचे आमदार अरुण नारंग यांना मारहाण करणे, चेहऱ्यावर काळा रंग फासणे आणि कपडे फाडल्याच्या आरोपावरून मुक्तरस जिल्ह्यातील मलोट पोलीस ठाण्यात ३०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे.

आमदार नारंग यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. राज्यपाल व्ही.पी. सिंह बदनौर यांची शर्मा यांनी भेट घेऊन त्यांना घडलेली घटना सांगितली. पंजाब सरकारचे हे अपयश असल्याचे सांगून हल्ल्याचा निषेध केला.   दरम्यान, नारंग म्हणाले की, असे हल्ले करून पंजाब सरकार भाजप कार्यकर्त्यांना खचवू पाहते; परंतु असे होणार नाही.  

राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेता येणार नाही. अशा हिंसक मार्गांनी 
आंदोलक शेतकऱ्यांनीही जायला नको.
-कॅप्टन अमरिंदर सिंग, 
मुख्यमंत्री, पंजाब

आमदार अरुण नारंग यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्यात राज्याच्या पोलिसांना अपयश आले. या अपयशाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तटस्थ चौकशी व्हायला हवी.
-सुखबीरसिंग बादल, प्रदेशाध्यक्ष, शिरोमणी अकाली दल, पंजाब  
 

Web Title: Narang attack case: FIR against 300 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.