नवी दिल्ली: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते १६ ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. यातच आता केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे कामाला लागले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणवासीयांसाठी ३ महत्त्वाच्या मागण्या केल्याची माहिती मिळाली आहे. (narayan rane meets railway minister ashwini vaishnav and give proposal 3 demands for konkan)
“...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे, डॉ . भारती पवार , डॉ . भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी येत्या १६ ऑगस्टपासून हे मंत्री राज्याच्या वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. यानंतर लगेचच नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
Paytm ला मोठा धक्का! IPO रोखा, गंभीर आरोप करत माजी संचालकांची सेबीकडे मागणी
कोकणवासीयांसाठी तीन प्रमुख मागण्यांचा प्रस्ताव
नारायण राणे यांनी कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील, असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडले. यामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशा तीन मागण्या नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. यानिमित्ताने नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून राजकीय फासे टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे.
भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले
दरम्यान, यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटरची यात्रा काढतील. याच काळात डॉ. भारती पवार या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ४३१ किलोमीटरची यात्रा काढतील. डॉ. भागवत कराड मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा २५ ऑगस्टपर्यंत ६५० किलोमीटरचा प्रवास करेल. या यात्रेत चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधतील. भागवत कराड हे मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल.