सुरत : स्थानिक न्यायालयाने स्वयंभु आध्यात्मिक गुरू आसारामबापूचा मुलगा नारायण साई आणि त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध मंगळवारी एका बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित केले.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस.मुलिया यांनी साई व त्याच्या साथीदारांविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक संबंध, छेडखानी, ओलीस ठेवणे, धमकी आणि गुन्हेगारी कटकारस्थानाशी संबंधित भांदविच्या कलमान्वये आरोप निश्चित केले असून पुढील सुनावणी १ सप्टेंबरला होईल. (वृत्तसंस्था)
नारायण साईवर आरोप निश्चित
By admin | Published: August 18, 2015 10:16 PM