नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर असताना इंधन भरण्यासाठी विमान दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी थांबवावे लागते तेव्हा पंतप्रधाननरेंद्र मोदी कधीही हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी जात नाहीत. ते विमानतळावरच स्नान वगैरे उरकून लगेच पुढच्या प्रवासाला रवाना होतात, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.एसपीजी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना शहा म्हणाले की, पूर्वी इंधन भरण्यासह अन्य तांत्रिक कारणांसाठी विमान एखाद्या विमानतळावर रात्रीसाठी थांबायचे, तेव्हा पंतप्रधान मुक्कामासाठी हॉटेलात जायचे; पण नरेंद्र मोदी यांनी विमानाच्या थांब्याच्या वेळी एकदाही हॉटेलात जाऊन विश्रांती घेतली नाही. परदेश दौºयात नेहमीपेक्षा २० टक्के कमी कर्मचारी सोबत नेण्यास सुरुवात करून मोदी यांनी नवा पायंडाही पाडला आहे. परदेश दौºयावर पंतप्रधानांसोबत जाणाºया कर्मचाऱ्यांसाठी बसची व्यवस्था करावी, असेही निदेश मोदी यांनी दिले.
एसपीजीला न कळवता प्रवासराहुल गांधी यांनी २०१५ पासून भारतात १,८९२ वेळा व परदेशात २४७ वेळा ‘एसपीजी’ला न कळवता प्रवास केला. सोनिया गांधी यांनी ‘एसपीजी’ची बुलेटप्रूफ मोटार न घेता दिल्लीत ५० वेळा व देशात इतर ठिकाणी १३ वेळा प्रवास केला. तसेच त्या ‘एसपीजी’ला न कळविता २४ वेळा परदेशात गेल्या.याचप्रमाणे प्रियांका गांधी यांनी ‘एसपीजी’ सुरक्षा न घेता दिल्लीत ३३९ वेळा तर अन्य ठिकाणी ६४ वेळा प्रवास केला. त्यांनी १९९१ नंतर ९९पैकी ७८ परदेश दौरे ‘एसपीजी’ सुरक्षा न घेता केले, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली.