'Narendra Arohanam': ब्रह्मपूर (ओडिसा) : ओडिसाच्या गंजम जिल्ह्यातील एका संस्कृत विद्वानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर संस्कृत भाषेत एक महाकाव्य लिहिले आहे.
तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक सोमनाथ दास यांनी लिहिलेले आणि गुजरातमधील वेरावल येथील सोमनाथ संस्कृत विद्यापीठाने प्रकाशित केलेले ७०० पानांचे ‘नरेंद्र आरोहणम’ हे पुस्तक गेल्या आठवड्यात वेरावल येथे झालेल्या युवा महोत्सवात प्रकाशित झाले. या पुस्तकात १२ प्रकरणांमध्ये १,२०० श्लोक आहेत, ज्यांचे वर्णन इंग्रजी आणि हिंदीमध्येही आहे.
त्यात मोदींच्या बालपणीच्या कारकिर्दीपासून, गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीपासून ते पंतप्रधान म्हणून दुसऱ्या कार्यकाळापर्यंतच्या जीवन प्रवासाचे वर्णन केले आहे. या महाकाव्याबाबत प्राध्यापक सोमनाथ दास यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.