शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Narendra Modi : नरेंद्र मोदींना 72 % रेटींग, भारताचे PM ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 8:34 AM

अमेरिकेतील रिसर्च एजन्सी असलेल्या मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगली क्रेझ आहे. जगप्रसिद्ध नेते म्हणून मोदींनी जगभरात ओळख आहे, हीच ओळख आणखी प्रखर झाली असून जगभरातील टॉप नेत्यांच्या यादीत मोदींनी पहिले स्थान मिळवले आहे. 72 टक्के रेटींगसह मोदी या यादीत पहिल्या स्थानावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 41 टक्क्यांसह सहाव्या स्थानावर आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल लीस्ट 2022 नुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

अमेरिकेतील रिसर्च एजन्सी असलेल्या मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर असून इंग्लंडेच बोरिस जॉन्सन हे 12 व्या स्थानावर आहेत. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत जो बिडेन 6 व्या क्रमांकावर आहेत. तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाली आहे, ते आठव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो हे 9 व्या क्रमांकांवर असून त्यांनाही 41 टक्के रेटिंग या सर्वेक्षणात मिळाली आहे.

या 13 जगविख्यात नेतेमंडळींच्या यादीत 4 देशांच्या नेत्यांना समसमान म्हणजेच 41 टक्के एवढी रेटींग मिळाली आहे. त्यामध्ये, अमेरिकेचे जो बायडन, दक्षिण कोरोयाचे राष्ट्राध्यक्ष मून जाईन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा समावेश आहे. 

यापूर्वीही मोदी अव्वलस्थानी

नोव्हेंबर 2021 मध्येही जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

अशी ठरते रेटिंग

लोकप्रिय नेत्यांची रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या सरासरीवर आधारित आहे. नमुन्यांचा आकार देशांनुसार बदलतो. याच वेबसाइटने मे 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना 84 टक्के मंजुरीसह सर्वोच्च रेटिंग दिली होती. जी मे 2021 मध्ये 63 टक्क्यांवर आली. ताजी रेटिंग 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका