नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जग भरात जात आहेत, ती रिकामी येत नाहीत. ते आपल्या सोबतीने भारताप्रति विश्वास आत्मीयता, स्नेह, आशीर्वाद आणि एक भावनात्मकता घेऊन येत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. ते बजेटमधील डीपीआयआयटीशी संबंधित घोषणांसंदर्भात एका वेबिनारला संबोधित करत होते. (Narendra Modi address webinar on budget announcement related to dpiit niti aayog after corona situation vaccine supply to abroad)
व्हॅक्सीन प्रमाणेच भारतातील तृणधान्यही उपयोगी - पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांकडून 2023 हे 'International Year of Millets 2023' घोषित केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, भारताच्या या प्रस्तावाचे 70 हून अधिक देशांनी समर्थन केले आहे. मोदी म्हणाले, आपण योगाला ज्या पद्धतीने संपूर्ण जगभर पसरवले त्याच पद्धतीने आपण सर्वजण एकत्रितपणे तृणधान्यही (भरड) संपूर्ण जगात पोहोचवू शकतो. ज्या पद्धतीने कोरोनापासून वाचविण्यासाठी मेड इन इंडिया व्हॅक्सीन आहे. त्याच पद्धतीने लोकांना आजारी पडण्यापासून वाचविण्यासाठी भारतात तयार होमारे तृणधान्यही तेवढेच उपयोगी आहे.
जवळपास 520 बिलियन डॉलर्सचे उत्पादन होण्याची आशा -पंतप्रधान मोदी म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात PLI स्किमशी संबंधित योजनांसाठी जवळपास 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्नाच्या सरासरी 5 टक्के इंसेंटिव्हच्या स्वरुपात देण्यात आले आहेत. केवळ पीएलआय स्कीमच्या सहाय्यानेच येणाऱ्या पाच वर्षांत जवळपास 520 बिलियन डॉलरचे उत्पादन भारतात होण्याची शक्यता आहे.
देशातील लोकांना लस मिळत नाही आणि तुम्ही इतर देशांना देताय -यातच, दिल्ली उच्च न्यायालयाने, देशातील नागरिकांना लस मिळत नसताना तुम्ही ती अन्य देशांना का देत आहात. लसनिर्मितीच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर का करत नाही, असा सवाल सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला विचारला आहे. याच बरोबर, कोरोना लसीकरणासाठी वर्गिकरण करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे.