शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची महाबलीपुरम येथे होणार भेट, काश्मीरवर चर्चा होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 9:03 AM

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे भेट होणार आहे.

नवी दिल्ली/महाबलीपुरम - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे भेट होणार आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र मोदी आणि जिनपिंग यांच्या काश्मीरप्रश्नावर चर्चा होणार का हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची घोषणा भारत सरकारने केल्यानंतर चीनने त्याचा विरोध केला होता. तसेच काश्मीरच्या मुद्द्यावर आपण भारतासोबत सहमत नसल्याचे चीनने वारंवार सांगितले होते. मात्र काश्मीरबाबतचे चीनचे मत भारताने नेहमीच फेटाळून लाववेले आहे. त्यामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणाऱ्या बैठकीत काश्मीर प्रश्न उपस्थित झाल्यास त्यामुळे चर्चेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मोदी आणि जिनपिंग यांच्यात व्यापार, गुंतवणूक अशा प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे चीनची आर्थिक कोंडी झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी मालाच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताला आपल्या बाजूने वळवणयाचा चीनचा प्रसत्न आहे.  दरम्यान, गुरुवारी चिनी परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीर प्रश्नावरून चर्चा करण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली. काश्मीरबाबत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, काश्मीरबाबत चीनची भूमिका स्पष्ट आणि स्थायी आहे.' त्यामुळे काश्मीरबाबत चीनच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन