नवी दिल्ली - प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, तर आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब आहे. आमचा विरोध या काँग्रेसी संस्कृतीला आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेसी संस्कृतीपासून मुक्ती आहे, असे मोदींनी भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी खेळताना प्रियांका गांधी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करत त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. आहे. तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, प्रियांका गांधी भाजपाचा उत्तर प्रदेशातील बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला आव्हान देणार आहेत. त्या फेब्रुवारीमध्ये आपला पदभार सांभाळतील. दरम्यान, प्रियांका गांधी पुन्हा राजकारणात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी(भाजपा) भयभीत झाली आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. मी खूप खुश आहे. कारण, प्रियांका माझ्यासोबत काम करणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्यासाठी आम्हाला तरुण नेतृत्वाची गरज होती. प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे शक्तिशाली नेते आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. मात्र राहुल गांधी हे आपल्या पक्षाला योग्य नेतृत्व देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच प्रियांका गांधी यांना पक्षाच्या महासचिव बनवण्यात आले आहे, असा टोला भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला आहे.
काही जणांसाठी कुटुंब हाच पक्ष, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:37 PM
प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
ठळक मुद्देप्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, तर आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब आहे काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेसी संस्कृतीपासून मुक्ती