शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आपणही करूशकता विश; करावं लागेल फक्त एवढं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 9:11 AM

How To Wish PM Modi On His Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 72 वर्षांचे झाले आहेत. या आनंदाच्या क्षणी त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जर आपलीही इच्छा असेल, तर आपणही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

पंतप्रधाननरेंद्र मोदी आज 72 वर्षांचे झाले आहेत. या आनंदाच्या क्षणी त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, अनेक भेटवस्तूही येत आहेत. जर आपलीही इच्छा असेल, तर आपणही पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपल्याला एक छोटेसे काम करावे लागेल. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाप्रकारे विश करू शकतो अथवा शुभेच्छा देऊ शकतो जाणून घेऊयात...

अशा पद्धतीने करता येईल विश - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विश करण्यासाठी सर्वात सोपे माध्यम म्हणजे NaMo अ‍ॅप. या अ‍ॅपच्या माध्यमाने आपण त्यांना मेसेज, व्हिडिओ अथवा फोटो पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. याशिवाय आपण Gift of Seva या माध्यमानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना विश करू शकता.

NaMo अ‍ॅपच्या माध्यमाने कसे कराल विश? - नमो अ‍ॅपच्या माध्यमाने आपण आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून पंतप्रधान मोदींना विश करू शकता. तसेच, आपल्याला त्यांना फोटो पाठवून शुभेच्छा देण्याची इच्छा असेल, तर आपण तो फोटो अ‍ॅपवर अपलोड करकरून त्यांना शुभेच्छा देऊ शकता. 

कुटुंबासह विश करा - यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, संपूर्ण कुटुंबासह शुभेच्छा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी आपण e-card बनवून, त्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश करू शकता. तसेच त्याखाली एखादा मेसेजही लिहू शकता. यानंतर आपण हे e-card अपलोड करून मोदींना शुभेच्छा देऊ शकता. महत्वाचे म्हणजे आपण एकापेक्षा अधिक e-card देखील पाठवू शकता.

या पद्धतीनेही देता येतील शुभेच्छा... - PM नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एका अनोख्या पद्धतीने विश करता येऊ शकते. ‘Gift of Seva’ या नव्या फीचरच्या माध्यमाने युजर्स कुठल्याही भागात जाऊन संकल्प करू शकतात. ते Blood Donation, Leading Digital, TB Mukt Bharat, Swachh Bharat, Vocal for Local to Become Atma Nirbhar, Ek Bharat, LiFE: Pro-Planet People, India Shreshtha Bharat and Catch the Rain यांपैकी कुठल्याही पद्धतीचा संकल्प करू शकतात. 

NaMo अ‍ॅपच्या माध्यमाने सर्व प्रकारचे संकल्प अथवा प्लेज रेकॉर्ड केले जातील. एवढेच नाही, तर आपण या अ‍ॅपवर 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि किसान सेवा आदींसाठी डोनेट करू शकता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान