नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी पार पडला. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात काही जुन्या चेहऱ्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र यावेळी मंत्रीपदाची शपथ घेताना दोन मंत्र्यांकडून चूक झाली. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करत चूक सुधारण्याच्या सूचना केल्या.
मनसुख मंडाविया यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी 'मै' म्हणून शपथ देण्यास सुरुवात करून दिली. मात्र मंडाविया 'मैं' म्हटलेच नाही. त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख करत शपथ घेण्यास सुरुवात केली. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना रोखत म्हणाले, मंत्रीजी आधी 'मैं' म्हणा. त्यानंतर मंडाविया यांनी मैं म्हणत शपथ घेण्यास सुरुवात केली.
मंडाविया यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच, राज्यमंत्रीपद मिळालेले फग्गन सिंह कुलस्ते यांनी देखील तीच चूक केली. फग्गन यांनी 'मै' न म्हणताच शपथ घेण्यास सुरुवात केली होती. त्यावर राष्ट्रपतींनी त्यांना पुन्हा एकदा व्यवस्थीत शपथ घेण्यास सांगितले. तर राज्यमंत्री अश्विनी चौबे शपथ घेताना काही ओळी विसरल्या होत्या. मात्र नंतर त्यांनी सुटलेल्या ओळी पुन्हा वाचल्या.