शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 4:25 AM

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारने आर्थिक मुद्द्यावर तत्काळ सर्वपक्षीय विश्वास संपादन करावा. परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी या पक्षांशी चर्चा करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.सरदार पटेल हे भौगोलिक परिवर्तनाचे जनक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाचे, तर मोदी आर्थिक परिवर्तनाचे जनक आहेत, असे शहा यांनी रविवारी म्हटले होते. काँग्रेसचे प्रवक्ते खा. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. विकास दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. मोदी सरकारने या गणनेची पद्धत बदलल्याने ही आकडेवारी दिसत आहे. जुन्या पद्धतीने आकडेवारी तपासली असती, तर विकास दर ३ ते ४ टक्क्यांच्या आसपास असता.शहा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, खोटे बोलून व्यवस्था चालू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, ७० वर्षांत देशाची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट कधी नव्हती आणि शहा खोटी स्तुती करून मोदींना आर्थिक परिवर्तनाचे जनक म्हणत आहेत. देशात रोजगाराचा यक्ष प्रश्न आहे. सरकारी आकडे सांगतात की, रोजगाराची परिस्थिती गत ८ वर्षांतील सर्वात किमान स्तरावर आहे.सीएमआयचा डेटा सांगतो की, १५ लाख लोकांच्या नोकºया गेल्या. निवडणुकीत काय शब्द दिला होता व प्रत्यक्षात काय होत आहे? शेतकºयांना किमान आधारभूत किमतीसोबत ५० टक्के बोनसचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असे सवाल करून अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, सरकारने आता ते देणे शक्य नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे सांगितले आहे.>स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रकारगुंतवणूक २७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, निर्यात घसरली आहे. छोट्या उद्योगातील विकासात १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही अमित शहा यांना वाटते की, देशाची प्रगती होत आहे. एनपीएत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे, पण सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह