शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

Narendra Modi: पंजाबच्या विजयाबद्दल 'आप'लं अभिनंदन, PM मोदींनी दिलं महत्त्वाचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:59 PM

मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली - देशाच्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यश मिळवलं असून भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यालयापासून लखनौपर्यंत भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. युपीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी सभेला संबोधित करताना जनतेचे आभार मानले. तसेच, विरोधकांवर जोरदार प्रहारही केला.

मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. तसेच, केंद्र सरकार म्हणून पंजाब राज्यासाठी शक्य ते पाठबळ देण्याचं काम मी करेन, असे आश्वासनही मोदींनी आम आदमी पक्षाला दिले आहे.

मी पंजाबमधील भाजप कार्यकर्त्याचं विशेष रुपाने कौतुक करतो. कारण, कठिण परिस्थितीतही त्यांनी ज्याप्रकारे पक्षाचा झेंडा बुलंद केला. त्यानुसार, पुढील काळात पंजाबमध्ये भाजप ताकदीनिशी विकसीत करण्यात येईल. पंजाब एक शक्तीच्या रुपाने पुढे येत असल्याचं मी आपल्या डोळ्यांनी पाहतोय. सीमावर्ती राज्य असल्याने पंजाबला, फुटीरतावादी राजकारणापासून सतर्क ठेवण्यसाठी भाजप कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता हे काम करत राहिल, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले. 

दरम्यान, नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाव न घेता टिका केली. तर, सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर होणाऱ्या टीकेवरुनही विरोधकांना, टिकाकारांना सुनावले. सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादावरही मोदी बोलले. तसेच, युक्रेनमधून भारतात परतलेल्या नागरिकांसाठी चालवलेल्या मोहिमेवरुन होत असलेल्या प्रांतवादाच्या टिकेवरुनही त्यांनी आपलं मत मांडलं.  

लोकशाही भारतीयांच्या नसानसात 

सध्या सुरू असलेल्या युद्धाचा प्रभाव जगावर होत आहे. मात्र, जे देश युद्ध लढत आहेत, त्यांच्याशी आर्थिक, सुरक्षा, शिक्षण, राजकीयदृष्टीतून भारताचं नातं आहे. सध्या तेल, गॅस, फर्टीलायजर, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जगभरातील देशांमध्ये महागाई वाढत आहे. या कठिण परिस्थितीतही यंदाच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास भारत आत्मनिर्भर होत असल्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. जगभरातील या अनिश्चितेच्या वातावरणात भारताच्या जनतेनं, विशेषत: उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे. या निवडणुकीत लोकांना स्थीर सरकारसाठी मतदान केले, म्हणजे लोकशाही भारतीयांच्या नसानसात आहे. 

ऑपरेशन गंगा मोहिमेला प्रांतवादाशी जोडलं

युक्रेनमध्ये भारताचे हजारो नागरिक अडकले होते, तेव्हाही देशातील काहीजणांनी भारताचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे 'ऑपरेशन गंगा' या मोहिमेलाही प्रांतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीला जातीवाद, प्रदेशवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, असे मोदींनी म्हटले. मी निवडणुकांमध्येही विकासाच्याच गोष्टी केल्या. गरिबांना घर, गरिबांची प्रगती, विकास याच मुद्द्यावर मी भाष्य केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपाElectionनिवडणूकPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२