ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या विजयानंतर विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. सोबतच ज्या नगरसेवकांनी पक्षाचा आदेश मानत निवडणुकीतून माघार घेतली, आणि कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम केलं त्यांनाही शुभेच्छा देत आभार मानले. "दिल्ली महापालिकेतील विजय अंतिम नाही, दिल्लीमध्ये आपलं सरकार आणण्याची ही सुरुवात असल्याचं", अमित शहा यावेळी बोलले आहेत. "महापालिकेला आपलं काम दाखवून दिल्लीत जागा तयार करायची आहे. जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवत त्यांच्या अपेक्षा पुर्ण करायच्या आहेत. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आपण नम्र असणं गरजेचं आहे", असं अमित शहा बोलले आहेत.
2014 पासून जनतेने डोळे झाकून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे असं अमित शहा यांनी सांगितलं. तसंच आपण इतक्या सभा घेतल्या, मात्र कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. आम्ही लोकांना आपलं म्हणणं सांगितलं. लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला मतदान केलं असल्याचं अमित शहा बोलले आहेत. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोमणा मारत म्हटलं की, "ईव्हीएममुळे आम्ही जिंकलो असा आरोप केजरीवाल करत आहेत, खरं माहिती करुन घ्यायचं असेल तर आमच्या बूथ - इनचार्जला भेटा".
जनतेला बोलणारे पंतप्रधान हवे होते -
अमित शहा बोलले आहेत की, "जनतेला बोलणारे पंतप्रधान हवे होते. त्यांना पंतप्रधानांना ऐकायचं होतं. दुसरी त्यांची काहीच अपेक्षा नव्हती. पण पंतप्रधान मोदींनी 20-20 तास काम करु देशाला या उंचीवर आणलं आहे. पंतप्रधान मोदी चालत नाही, तर झेप घेतात".
Kejriwal-ji might blame EVMs for our victory, to know real reason, meet our booth in-charge: Amit Shah in Delhi, addressing BJP corporators pic.twitter.com/zfU0IO25Rd— ANI (@ANI_news) May 2, 2017
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येताच हे सरकार गरिब, बेरोजगार, शेतक-यांसाठी समर्पित असल्याचं सांगितलं होतं. देशाचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी हे वचन दिलं होतं. आज तीन वर्षानंतर मोदींनी प्रत्येक मुद्द्यावर काही ना काहीतरी काम केलं आहे. सर्वांना समाधीनी करण्यात त्यांना यश मिळालं आहे. भारताची अर्थव्यवस्था सुधरत असल्याचं तज्ञ सांगत आहेत", असं अमित शहा यांनी सांगितलं.