वॉशिंग्टन: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावले आहेत.
पुराव्याशिवाय गुन्हा दाखलरिचमंडचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने हा गुन्हा दाखल करण्याचा कारवाना केला आहे. न्यूयॉर्कमधील वकील रवी बत्रा यांनी याला 'वेन केस' म्हटले आहे. रवी बत्रा म्हणाले की, लोकेश व्युरुने न्यायालयाचा वेळ वाया घालवला आहे. 53 पानांच्या तक्रारीद्वारे ते फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत. हे निरर्थक प्रकरण आहे, त्यामुळे एकही वकील यावर त्यांची बाजू मांडायला तयार नाही. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव आहे.
हे आरोप तक्रारीत करण्यात आले डॉक्टरांनी आरोप केला की, पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह इतर लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण करत आहेत. तसेच, राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअरच्या वापरासह भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोपही डॉक्टराने केला आहे. 24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. भारतात हे समन्स 4 ऑगस्टला पाठवण्यात आले.