अंबिकापूर ( छत्तीसगड) - जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. दरम्यान, छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी थरूर यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. चार पिढ्या राज्य करणाऱ्यांनी आपल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे, पण ते चार वर्षे काम करणाऱ्यांकडे हिशोब मागत आहेत, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला. छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार रंगला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंबिकापूर येथे सभा घेतली. या सभेमध्ये मोदींनी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी चायवाला संबोधून केलेल्या टिप्पणीचा आधार घेत काँग्रेसवर सडकून टीका केली. " आता काँग्रेसवाले म्हणताहेत की नेहरूंमुळे एक चायवाला देशाचा पंतप्रधान बनला. आता तुम्ही जर लोकशाहीचा एवढाच सन्मान करत असाल तर एक छोटंस काम करा. जर तुम्ही पंडित नेहरू आणि संविधानामधील तुमच्या भूमिकेमुळे एक चायवाला पंतप्रधान बनला, असा दावा करत असाल तर केवळ एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या." असे आव्हान मोदींनी काँग्रेसला दिले. भाजपा सरकार कुठलाही भेदभाव न करता काम करत आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा मंत्र् आहे, असा दावाही मोदींनी यावेळी केला. तसेच भाषणादरम्यान अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करताना वाजपेयींनी रक्ताचा एक थेंबही वाहू न देता राज्याचे विभाजन केले होते, असेही मोदींनी सांगितले.
नेहरूंमुळे 'चायवाला' पंतप्रधान? नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांना दिले असे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 3:22 PM
जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. आता मोदींनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे...
ठळक मुद्देजवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होताकेवळ एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या